Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

नवी सांगवीतील जगदंब प्रतिष्ठान व निखिल चव्हाण मित्र परिवार गोरगरिबांसाठी बनत आहेत देवदूत!

पुणे|नवी सांगवीतील जगदंब युवा प्रतिष्ठान व निखिल चव्हाण मित्र परिवारातर्फे कोरोनाच्या काळात आर्थिक
संकटात सापडलेल्या जवळपास ९० कुटूंबाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना सारख्या मोठ्या महामारीच्या काळात अनेक घरात काही ना काही समस्या आहेत हे लक्षात घेऊन जगदंब युवा प्रतिष्ठान व निखिल चव्हाण मित्र परिवारा तर्फे हे अन्न धान्य वाटप करण्यात आले. या अगोदरही कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण देण्यातआले होते.

या अन्नधान्य वाटपावेळी धनश्री चव्हाण (पाटील), कपिल जाधव, नरेंद्र फुलपगारे, स्वप्नील शितोळे, अतुल वळे, आदित्य वळे, तेजस निकम, आदित्य धुमाळे,सौरभ कापसे, आदेश शित्रे, ओम सालकर, समीर खरात, अविनाश मोहीते इत्यादी मान्यवर उपस्थित होते
Exit mobile version