Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

दुःखद बातमी; देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्राणज्योत मावळली, घेतला अखेरचा श्वास!

Spread the love

नवी दिल्ली | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं दीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते. त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली. 10 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होतं की,  ‘दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे’.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगला येथील बिरभूम येथे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकिर्द आहे. प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं होतं. ते देशाचे तेरावे राष्ट्रपती होते. 25 जुलै 2012 ला राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ घेतली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.  इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतलं असून इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणव मुखर्जी अनेक महत्वाच्या पदावर होते. अनेक महत्त्वाच्या खात्यांचं त्यांनी काम पाहिलं आहे.  प्रणव मुखर्जी यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होतं. काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं अनेक वादंग निर्माण झाला होता.

Exit mobile version