Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

काझड येथे भाजपला मोठी खिंडार; माजी सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

इंदापूर | काझड गावच्या माजी सरपंचासह अनेकांनी सोमवारी पुणे येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काझड गावच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून भविष्यात ही गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल असे आश्वासन यावेळी भरणे यांनी दिले आहे.

काझड गावचे माजी सरपंच सचिन काशिनाथ नरुटे, सुरज प्रकाश पाटील (अध्यक्ष भैरवनाथ विद्या प्रतिष्ठान काझड) नवनाथ पंढरीनाथ नरुटे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती काझड, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मा. पंचायत समिती सदस्य बापूराव पाटील, छत्रपतीचे संचालक तानाजी पाटील, काझडचे सरपंच अजित पाटील दादासाहेब वणवे, बाळासाहेब म्हेत्रे, रतीलाल पाटील, दत्तात्रय पाटील, नामदेव पाटील अध्यक्ष तंटामुक्त समिती,मा. उपसरपंच बापूराव पाटील काझड आदी उपस्थित होते.

Exit mobile version