Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

इंदापूर तालुक्यातील रक्तदाते कायम ऍक्टिव्ह; शिवशंभु ट्रस्टचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले कौतुक!

Spread the love

इंदापूर | महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असल्याने 2 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितल्यानंतर नेहमीप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा 80 वा वाढदिवस हा रक्तदान करून साजरा करावा असे आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादीनेही श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या साथीने पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 35 गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी घेतली आणि अशाप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये माननीय दत्तात्रय भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कै भगवानराव भरणे प्रतिष्ठान लोकसेवक गणपतराव फाउंडेशन भारतीय जैन संघटना ह्युमन राईट फाउंडेशन या सर्वांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे आज विठ्ठल पेट्रोलियम जंक्शन येथे रक्तदान मोठ्या प्रमाणात पार पडले जवळपास 190 लोकांनी रक्तदान केले असे श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी सांगितले.

तसेच उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यामध्ये बेलवाडी, अंतुरने, इंदापूर शहर,माळेगाव लोणावळा, बीड, पाटोदा या शहरांमध्ये रक्तदानाचे आयोजन केले आहे तरी सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाच्या चळवळीमध्ये श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट सोबत राहावे असे आवाहन प्रश्न वतीने करण्यात आले.

Exit mobile version