Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

इंदापूर तालुक्याच्या आरोग्यदूताचे आरोग्यपर्व विश्वसनीय; 232 रुग्णांना 1 कोटींच्या पुढे मदतीचा हात!

Spread the love

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: मंगेश चिवटेंचे निकटवर्तीय शिवश्री भूषण सुर्वे यांच्या पाठपुराव्यामुळे पुणे जिल्ह्याची एका वर्षाची कहाणी

इंदापूर | महाराष्ट्रातील गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून मदत केली जाते, गेल्या 2 वर्षात राज्यातील रुग्णांना 300 कोटींची मदत वितरित करण्यात आली असून हा विश्वविक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नावाने भविष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, यापैकी चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्ह्यातील 232 रुग्णांना शिवश्री भूषण सुर्वे यांच्या प्रयत्नाने 1 कोटी 5 लाख 45 हजार रुपयांची मदत तसेच 2 वर्षांमध्ये 150 पेक्षा जास्त रुग्णांच्या बिलामधून 70 लाखांपेक्षा जास्त सवलत मिळवून देण्यात यश आले आहे. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे मेंदूचे विकार, अपघातामुळे झालेल्या हाडांच्या शस्त्रक्रिया नवजात शिशु, बर्ण रुग्ण, शेतामध्ये विजेचा करंट लागणे, हिप सिप्लेसमेंट, अशा विविध आजारांसाठी सदर आर्थिक मदत करण्यात आली आहे.

तसेच पुणे जिल्ह्यामध्ये रुग्णांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा कक्ष प्रमुख सुर्वे यांच्या सोबतीने विशाल धुमाळ, सीमा कल्याणकर, सतीश गावडे, अर्जुन मंडलवार, मंगेश खताळ, शशिकला काळे, दुर्गा सोनवणे, नागेश जाधव, नीता कटके, सोमनाथ लांडगे, आनंद केकान, सागर आवटे ही सर्व टीम संबंधित रुग्णाकडे जाऊन त्यांच्या अर्ज भरून कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता करण्यास सतत कार्यरत असते. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व टीम व प्रत्येक जण ही योजना निशुल्क आणि मोफत असल्याचे सांगून आपुलकीने पदरमोड करून अहोरात्र झटत आहेत.

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या अनेक रुग्णांना केवळ पैसे नसल्याने गंभीर आजारांवर उपचार घेताना अडचण येतात, अशा रुग्णांसाठी आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या पुढाकाराने आता रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवणे अजून सोपे झाले असून 8650 567 567 या टोल फ्री नंबर वरती संपर्क केल्यास आपणाला एका मिनिटाच्या आत मध्ये या योजनेचा फॉर्म उपलब्ध होणार आहे. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही प्रक्रिया संपूर्णपणे निशुल्क असून यामध्ये कोणी आर्थिक देवाण-घेवाण करू नये असे यावेळी सांगितले.

 – भूषण सुर्वे (पुणेजिल्हा कक्ष प्रमुख – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष )

यापुढे पुणे जिल्ह्यातील रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून मदत मिळवून देण्यासाठी व माणुसकी जपत कार्यरत आम्ही सर्वजण राहून समाजाची सेवा करून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मंगेशजी चिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या समाज सेवेसाठी आम्ही कार्यरत राहू असे सुर्वे यांनी सांगितले.

Exit mobile version