Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न!

Spread the love

इंदापुर | कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने तसेच श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी यांच्या सहकार्याने काल सामाजिक कार्याची दखल घेत रक्ताचा तुटवडा लक्षात घेत रक्तदान शिबिर पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हँडसॅनिटाय करून आणि कोरोना विषाणूची योग्यती काळजी घेऊन यावेळी 567 लोकांनी रक्तगट तपासणी करून घेतली तर जवळपास 60 लोकांनी रक्तदान केलं.

देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन करण्यात येत आहे. याच उद्देशाने कृष्णाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद नरुटे, संस्थापक उपाध्यक्ष शुभम ताटे, संस्थापक सचिव विजय झगडे यांनी हवामानाचा अंदाज घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं, याला चांगला प्रतिसाद मिळाला. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महा राज्य यांच्या विशेष सहकार्यातून तसेच अक्षय ब्लड बँक हडपसर येथील डॉ. अभिजित अहिरकर, डॉ. रुपेश दरेकर, डॉ. प्रशांत शिगवण, डॉ. सागर लोहकरे, डॉ. समाधान मानेदेशमुख यांनी उपस्थित राहून, नियोजन बंध रक्तदान शिबिर पार पाडले. यावेळी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी व कृष्णाई कमिटीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

Exit mobile version