Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

निमगाव केतकी कोरोनाच्या छायेत; एका दिवसात 3 रुग्ण पॉझिटिव्ह?

Spread the love
FacebookTwitterGmailInstagramWhatsapp

इंदापुर | दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये कोरुना पेशंट मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी एकमेव गावाचे होते तिथे एकही कोरोना पेशंट आढळला नव्हता हे निमगाव केतकी चे भाग्य होते परंतु काल निमगाव केतकी मधून एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची बातमी येताच उपप्रांत अधिकारी तसेच सोनाली मेटकरी तहसीलदार यांच्या निर्णयानंतर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे गाव तसेच त्या बाजूचा पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला होता.

परंतु आज दुर्दैवाने एका पॉझिटिव पेशंट मुळे जवळपास निमगाव केतकी ला मोठा हादरा बसल्याचे पुढे येत आहे निमगाव केतकी मध्ये एका दिवसात तीन कोरणा पॉझिटिव्ह टेस्ट आल्यामुळे आता निमगाव करांना मोठ्या धीराने या कोरोनाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी मोठे गाव असल्यामुळे निमगाव केतकी ला आता लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टर कडून सांगण्यात आले त्याचबरोबर निमगाव केतकी सोबतच केतकीला जोडूनच असलेले वरकुटे गावात 4 कोरोना पेशंट आढळून आले आहेत, त्याचबरोबर इंदापूर मध्ये 4 पेशंट व कळंब अकोले प्रत्येकी 1 पेशंट पॉझिटिव आल्याचे वृत्त समोर आले आहे

निमगावकरा ना कुठेतरी जपून वागण्याची वेळ आता नक्कीच आलेली आहे आहे त्याच बरोबर प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी ही ही कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सर्वांनी याला व्यवस्थित आणि काळजीपूर्वक सामोरे जाण्याची ची वेळ असल्याचे सांगण्यात आले

FacebookTwitterWhatsAppShare
GmailLinkedinFacebookTwitterWhatsapp
Exit mobile version