पुणे (पाषाण) | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मा. नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांच्या वतीने श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष सहकार्याने आज रविवार दि. ५/६/२०२२ रोजी पुण्यातील पाषाण येथे सोमेश्वर मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
कार्यक्रमाची माहिती देताना मा. नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आम्ही केलेल्या आवाहनाला परिसरातील युवकांनी नागरिकांनी आणि महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले हे फार आनंददायी आहे. परिसरातील तरुणांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी, निरोगी समाजासाठी, शिवविचारांना जागत, मोठ्या प्रमाणात मागील वर्षी पेक्षा या वर्षी सर्वांनी येऊन रक्तदान केले त्याबद्दल मी रक्तदात्यांचा आभारी आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबविणार आहोत त्यास देखील आपण असाच उदंड प्रतिसाद देत रहाल असा विश्वास आहे. ज्यांनी रक्तदान केले आहे त्यांना भविष्यात रक्ताची गरज लागल्यास त्यांनी सर्टिफिकीट वरती दिलेल्या नंबर वरती संपर्क साधल्यास त्यांना मोफत बॅग मिळण्यास 100% मदत होईल असेही यावेळी दादांनी सांगितले.
यावेळी सोमेश्वर देवस्थान विश्वस्त पोपटराव जाधव, कै. बाळोबा सुतार दिंडी अध्यक्ष खंडू अरगडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, RPI चे रमेश ठोसर, संजय निम्हण, संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, मोरेश्वर बालवडकर, बालम सुतार, योगेश सुतार, रुपेश जुनवणे, मुन्ना शिंदे, सुप्रीम चोंधे, तसेच शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे आणि परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.