Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

…राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही तर; पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार!

Spread the love

पुणे | अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत काढला आहे. व्यापारी वर्गांमध्ये या निर्णयाविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. जर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने या आंदोलनानंतर आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशाराही पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेहचंद रांका यांनी दिला आहे. पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठकीत आयोजित करण्यात आली. त्यावेळी बैठकीत निर्णय घेतला आहे.

आज पुणे व्यापारी वर्गाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्यात उग्र भावना व्यक्त करण्यात आल्या. या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गुरुवारी विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता दुकाने उघडतील आणि सायंकाळी ६ वाजता बंद करतील. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे. मात्र या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहील, असेही ते म्हणाले.

रांका पुढे म्हणाले, तसेच व्यापारी वर्गाने या आंदोलनावेळी राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासन यंत्रणेने जाहीर केलेल्या कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे जर आपला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर सोमवारपासून सर्व दुकाने नियमित सुरु करण्यात येतील.

Exit mobile version