Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी – कळंब तालुका क्रृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची मागणी!

 

परवेज मुल्ला
उस्मानाबाद :
मराठवाड्यासह कळंब तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००रु. मदत जाहीर करावी तसेच मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांचे कळंब चे तहसीलदार मंजुषा लटपटे यांना कळंब तालुका क्रृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी कळंब तालुकाध्यक्ष यशवंत लोमटे , युवती तालुका अध्यक्ष रेणुका तुपसौंदरे, तालुका कार्याध्यक्ष समाधान पौळ, विद्यार्थी तालुका अध्यक्ष मयुर गंभीरे तसेच सदस्य यु.दिपाली मुंडे, ऋषिकेश मुठाळ, आकाश जाधव आदी उपस्थित होते.

Exit mobile version