Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

सुजय विखे यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र; सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा!

मुंबई | राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे. जनतेने नाकारलेले असताना तीन पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा, असे भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. लोणी गावात माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या नेतृत्वाखाली आज एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार सुजय विखे पाटील हे देखील सहभागी झाले होते.यावेळी ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातून आज दूध दरवाढीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. यावेळी सुजय विखे म्हणाले की, केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला? असा सवाल सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली . संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय असून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा संजय राऊत यांनी अपमान केला आहे. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी, अशी मागणीही खासदार सुजय विखेंनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही? असा सवालही सुजय  विखे यांनी उपस्थित केला.

Exit mobile version