Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांत मोठी शिथिलता; सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि योगा क्लास सुरू होणार; ठाकरे सरकार!

Spread the love

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. तसंच नाट्यगृहे देखील आता खुली होणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार योगा क्लास आणि इनडोअर स्पोर्टस गेम्स यांनाही मुभा देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्तच्या ठिकाणी हे सर्व सुरू होईल. सिनेमा हॉल सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. सामाजिक अंतर आणि शासनाकडून सांगण्यात आलेल्या इतर उपाययोजना करणं बंधनकारक असणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.

Exit mobile version