पंढरपूर | महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील आणि यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या समविचाराने आषाढी एकादशीनिमित्त ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पंढरपूर शहरात चंद्रभागा बस्थानक व यात्री निवसाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर कोणाशीलाचे अनावरण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सुसज्ज असे उभारण्यात आलेल्या या नवीन बस्थानक व यात्री निवासी इमारतीत अनेक प्रशस्थ कक्ष तयार करण्यात आले आहे त्याचा फायदा नक्कीच वारकरी आणि नागरिकांना होईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितले. या इमारतीत तयार करण्यात आलेले काही महत्वाचे कक्ष -वाहतूक नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, प्रवाशांसाठी प्रशस्थ प्रतीक्षालय, पोलीस मदत कक्ष, आपला दवाखाना, जेणेरीक मेडिसिन अशी अनेक कक्ष तयार करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य थेऊर पै. युवराज (नाना) काकडे यांच्यासह बस्थानकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.