Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

गुड न्यूज; आपल्या मोबाईल वरील कोरोनाची कॉलर ट्यून आता 2 मिनिटांत बंद करता येणार!

Spread the love

कोरोना बाबत जागृती करण्यासाठी जवळपास चार महिने मोबाईल वरील कॉलर ट्यून चालू असल्यामुळे ग्राहक वैतागले होते जसे सर्वसामान्य नागरिक या वेळखाऊ फोनवर चिडवत होते ते त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा यावरती प्रश्न निर्माण केला होता ही कॉलर ट्यून ज्याला हवी आहे त्यांना असावी नको असेल तर बंद करता यावी असा कंपनीने काही मार्ग द्यावा अशी विनंती सर्वस्तरातून होत होती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्तांत कडून समजले आहे

फोन लावायचा असेल तर अनेकदा फोनची रिंग वाजते त्यामुळे अनेकांचा वेळ वाया जातो ही कॉलर ट्यून बऱ्याच वेळा ची असल्यामुळे एखाद्याला तेवढ्या वेळात अर्जंट काम सांगून फोन कट होतो कधीकधी सर्व कॉलर ट्यून ऐकल्यानंतर माहिती पडते की समोरच्याचा फोन बिझी होता किंवा बंद होता त्यामुळे अति संकटाच्या प्रसंग आला तर त्यावेळेस मात्र बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती हे सर्व लक्षात घेऊन कंपनीने आज कॉलर ट्यून आपण स्वतः बंद करू शकता हा ऑप्शन सर्वांना देण्यात आला आहे

चला तर बघू मग कोणत्या कंपनीचे सिम त्यावरून कॉलर ट्यून बंद कशी करावी

जिओ सिम असेल तर
Text “STOP” To 155223
या नंबर वरती मेसेज करावा.

◆ एरटेल चे सिम असेल तर
Dail*646*224# हा नंबर डायल करून
1 आकडा प्रेस करावा

◆ बी एस एन एल सिम असेल तर
Text “UNSUB” To 56700 or 56799
या नंबर वरती मेसेज करावा.

◆ वोडाफोन के सिम असेल तर
Text “CANCT” to 144
या नंबर वरती मेसेज करावा.

यानंतर आपल्या मोबाईल वरील कॉलर ट्यून काही क्षणात बंद होईल आणि आपण आपल्या आवडत्या हॅलो ट्यून चा आनंद पुन्हा घेऊ शकाल

Exit mobile version