Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

इंदापुर तालुक्याला दिलासा, लवकरच 2000 बेडची व्यवस्था करणार; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती!

Spread the love

इंदापूर | पुणे जिल्ह्यात आणि त्यामध्ये इंदापूर-बारामती ग्रामीण भागात कोरोनाचा जलद गतीने दिवसेंदिवस प्रसार होत आहे. दिवसोंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रशासनासमोर खूप मोठे आव्हान उभे ठाकले असून, आपल्या सर्वांच्या मदतीने कोरोनाला हरवायचे आहे. इंदापूर तालुक्याची कोरोनाची परिस्थिती पाहता इंदापूर तालुक्यासाठी 2 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीआज इंदापुर तालुक्यात भेटीदरम्यान बैठकीत दिली. इंदापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परीषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त अधिकारी हेमंत खराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तहसीलदार सोनाली मेटकरी, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक नारायण सारंगकर, दिलीप पवार, जीवन माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, सुरेखा पोळ, डॉ. सुहास शेळके, रघुनाथ गोफणे आदी विविध खात्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, कोरोना तपासणीचा वेग आल्याने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढल्याची दिसून येत आहे. तपासणी व कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे आव्हान आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात तीन पटीने कोरोना चाचणीचा वेग वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाने मृत्यू होण्याचा दर आम्हांला कमी करण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे.

आम्ही पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लक्ष देत असून, इंदापूर तालुक्यात दोन वेळा आम्ही दौरा केला आहे. दररोज जिल्हा परिषद मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांशी आम्ही रात्री ९.३० ते १०.३० या एका तासात सर्व चर्चा करत असतो. इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन बेडसाठी निधी उपलब्ध केला आहे. ११० बेड व 18 व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्याचे बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत.
तसेच इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करण्यात येणार असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घेऊन इतरांना ही काळजी घेण्यास सांगावे असे आव्हान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले तसेच या वेळेस राजकारण करू नये असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Exit mobile version