Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Good News: कोरोनावरील लस भारतीयांना मिळणार मोफत.. आदर पुनावला

Spread the love

पुणे| पूर्ण जगाच लक्ष लागून असलेल्या ऑक्सपोर्ड विद्यापीठ च्या लसी ने बघता बघता आघाडी घेतली.मानवा साठी वर्धान ठरलेली लस लवकरच अंतिम चाचण्या नंतर जगभरात वितरित होण्याची शक्यता आहे.या संशोधना मध्ये आपल्या भारता मधील मोठया लस उत्पादन कंपनीचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे या संशोधनाचा भारताला खूप फायदा होणार आहे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खुप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे एकूण उत्पादन च्या ५०% लस फक्त भारतीयांना पुरवणार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सीईओ आदर पुनावाला यांनी इंडिया टुडे या मुलाखती मध्ये स्पष्ट सांगितल.सरकार देणार लस आदर पुनावाला यांनी इंडिया टुडे टीव्हीला विशेष मुलाखत दिली. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीच्या चाचण्या अतिशय योग्य पद्धतीनं सुरू आहेत, असं पुनावाला यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘ऑक्सफर्ड विद्यापीठाचे लस संशोधनातील भागीदार म्हणून, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे लस उत्पादनात मोठे योगदान असणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्याची रितसर अनुमती घेण्याचे काम सुरू आहे.

ही चाचणी भारतात झाली आणि त्याचे चांगले परिणाम दिसले तर, मोठ्या प्रमाणात लस उत्पादन सुरू करता येईल.’ नियोजनाप्रमाणं जर लसीच्या चाचण्या झाल्या तर, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट काही लाख डोस तयार करू शकेल आणि 2021च्या मार्चपर्यंत जवळपास 30 ते 40 कोटी डोस तयार असतील, असंही अदर पुनावाला यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही, सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ती सामान्यांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

आम्हाला सरकारचा चांगला पाठिंबा मिळत आहे. आमच्या लस उत्पादनातील 50 टक्के लस भारतासाठी देण्यात येईल हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. उर्वरीत 50 टक्के उत्पादन हे जगातील इतर देशांसाठी असेल. संपूर्ण जग कोरोनाशी लढ देत आहे आणि आपल्याला संपूर्ण जगाचं या रोगापासून रक्षण करायचं आहे.
– आदर पुनावाला, सीईओ, सीरम इन्स्ट

Exit mobile version