भिगवण: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमधील मंगलदृष्टी सोसायटीमधील नागरिकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे, एक एक रुपया जमवून येथे सामान्य लोकांनी घर घेण्याचे स्वप्न पाहिले परंतु घर घेताना जी सोयी-सुविधा देण्याची स्वप्न दाखवली ते काहीच नसल्याने नागरिकांनी हैराण होवून बारामती प्रांत व इंदापूरचे तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
मंगलदृष्टी सोसायटी (प्रकाश होम्स) ही दौंडचे बिल्डर हरिश लुंड यांनी २०१६-२०१७ साली बांधली होती, यावेळी फ्लॅट घेताना जाहिरात बुक मधे ज्या ज्या सोयी देण्यात येणार होत्या उदा, पिण्याचे पाणी, मैलचे सांडपाण्याचे चेंबर, CCTV कॅमेरे, कंपाउंड वॉल ७ फूट उंच आणखी २०-२२ सोयीसुविधा अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना वेळोवेळी हरिश लुंड मालकांशी बोलून आजपर्यंत फसवुक झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, उपविभागीय अधिकारी बारामती सो यांनी डेव्हलपमेंट करण्याअगोदर ज्या सुख सोयी देणे गरजेचे आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता बिल्डरने काम 80 टक्के पूर्ण झाले तरी अजून केलेल्या नाहीत. तसेच लोकांना पेपर मधील जाहिराती व त्याच्या प्रोस्पेटिक्स प्रमाणे तसेच एग्रीमेंट मध्ये लिहून दिलेल्या गोष्टींची कोणत्याही प्रकारची पूर्तता अजूनही केलेली नाही. पंधरा पंधरा वीस वीस दिवस लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही सोसायटीमध्ये महिला व कचरा गोळा होत असल्यामुळे पावसाळ्याचे पाणी त्यामध्ये साठवून दुर्गंधी पसरवण्याची भीती जास्त प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे वेगवेगळे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे.
या सर्व सुविधा मिळण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले होते व त्याचे पालन झाले आहे का नाही हे पाहण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी भाऊसाहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी बिल्डर हरीश लुंड यांनाही पाहणीसाठी बोलाविण्यात आले होते परंतु ते यावेळी उपस्थित राहिले नाहीत, आता तहसीलदार आणि भिगवण मंडल अधिकारी या प्रकरणाच्या कश्या प्रकारे मुळाशी जाऊन नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देतात हे पहावे लागेल.