Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

अखेर आजपासून पुणे अनलॉक; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा!!

Spread the love

पुणे | आजपासून पुणे अनलॉक झालं आहे. पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. आजपासून पुणे जिल्ह्यात दुकानं रात्री 8 तर हॉटेल 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अखेर पुण्यात कोरोनाबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले असून आज पासून साप्ताहिक सुट्टी वगळता सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळात खुली राहतील.

1 – मॉल्स ही खुले राहतील मात्र तिथं लशीचे 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश असेल.

2 – हॉटेल ,रेस्टॉरन्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू असतील.

3 – बाग सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 7 वेळात खुल्या असतील

4 – इनडोअर, आऊट डोअर खेळांना परवानगी असेल.

5 – मात्र धार्मिक स्थळे, थिएटर, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालयये बंदच असतील.

पुणे शहरात दोन्ही डोस घेतलेले नागरिक 7 लाख आहेत. एकूण उद्दिष्ट 33 लाख असून 18 लाख 62 हजार 720 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. शहराचा बाधित दर 3.3 टक्के इतका आहे.

2 डोसच्या सक्तीमुळे मॉल व्यावसायिक तर नाट्यगृहे सुरू न करण्याच्या निर्णयामुळे रंगकर्मी नाराज आहेत. उल्लंघन करून दुकाने उघडली म्हणून गुन्हे दाखल केलेल्या व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार नसल्याचं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळं संबंधित व्यापारी अडचणीत आलेत.

Exit mobile version