Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना, ‘ट्रान्सफर मंत्रालय’; चंद्रकांत पाटील

Spread the love

मुंबई |कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या  बदल्या करण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही महाविकास आघाडी  सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. यावरून भाजप सतत  टीका करताना दिसून येत आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरून केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना झाली आहे. नाव आहे ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री हे कोणी एक दोन नाहीत, तर अनेक आहेत. या मंत्रालयाचं ‘बजेट’ नाही… ‘टार्गेट’ असतं, अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याआधी राज्यातील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. चंद्रकांत पाटलांची ही मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, असा घणाघात त्यांनी केला होता. यावर आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर ‘ट्रान्सफर मंत्रालय’ म्हणून पाटील यांनी टीका केली आहे. त्यावर आता महाविकास आघाडी नेते काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असेल.

Exit mobile version