Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मा .शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थित ‘एक मराठा लाख मराठा’ संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावराण!

बारामती | महाराष्ट्रातील सर्वदूर गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्याचे ध्येय तसेच राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांचे जतन व संवर्धन हे उद्दिष्ठ ठेऊन राष्ट्रीय नेते श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक मराठा, लाख मराठा’ हि संस्था कार्य करणार आहे. असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक प्रतिक पवार, राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत पवार यांनी केले.
रविवारी (दि. 17 जानेवारी) बारामती येथिल गोविंद बाग येथे राष्ट्रीय नेते श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ‘एक मराठा, लाख मराठा’ या नोंदणीकृत संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष विक्रांत पवार, संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य युवराज दाखले, तसेच सचिन लिमकर, संजय माने, सुनिल सोनवणे, आकाश शेवाळे, श्री गाडे, वेदांत जाधव, प्रा. काशीनाथ आल्हाट, रामदास तांबे ,बाळा कुंभारआदी उपस्थित होते. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व थरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराबरोबरच क्रिडा व कला, सांस्कृतिक क्षेत्रात स्थान मिळविण्यासाठी हि संस्था मदत करेल असेही यावेळी सांगण्यात आले.

Exit mobile version