Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाला हरवूया, प्लाझ्मा दान करूया; श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट ची विशेष मोहीम होतेय यशस्वी!

Spread the love

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशातील सर्वात जास्त रूग्ण हे महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र राज्यातील कॅन्सर, थैलेसिमिया, कोरोना सारख्या रूगणांला रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय(मामा) भरणे आदींनी रक्तदान करण्याचे रक्तदात्यांना आवाहन केले. या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषणदादा सुर्वे, राज्य संपर्क प्रमुख श्री.आप्पासाहेब घोरपडे यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबीर घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी विशेष ऋण व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान हेच जीवनदान मानून एका फोनवरती सुद्धा रक्त उपलब्ध होऊ शकते. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.याच गोष्टीची दखल घेत प्लाजमा दान श्रेष्ठ दान हा विचार करून समाजातील गरजू कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाप्रमुख सोनालीताई जाधव यांनी पुढाकार घेतला.

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील व पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून प्लाझ्मा दान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांमध्ये श्री शिवशंभू ब्लड फौंडेशन पुणे जिल्हाप्रमुख सोनालीताई जाधव यांनी आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या च्या उपस्थितीत प्लाझ्मा दान केले.हर्षाली दिनेश माथवड नगरसेविका पुणे महानगर पालिका म्हणतात की सांगायला अतिशय आनंद वाटतो की सोनालीताई जाधव ह्या पुणे जिल्ह्यातील आपल्या कोथरूड मतदार संघातील पहिली महिला आहे की ज्यांनी सर्वात प्रथम कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान केले. ज्या महिलांना कोरोना होवून गेला आहे त्या सर्व महिलांनी घाबरून न जाता प्लाझ्मा दान करावे असे आव्हान सोनालीताई जाधव यांनी केले.
आपल्या कोथरुड मतदारसंघातील सर्वात कमी वयाची व प्रथम महिला म्हणून सोनालीताई जाधव यांनी आज प्लाझ्मा दान करून नक्कीच दोन नागरिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे त्याबद्दल समाजातून सोनालीताई चे खूप खूप मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे. सोनालीताई जाधव ह्या रक्तदान चळवळीत सक्रीय कार्यरत असणाऱ्या कोथरूड मतदार संघातील सर्व श्रेष्ठ महिला म्हणून त्यांचा गौरव करण्यात येत आहे. सोनालीताई जाधव ह्या सतत २४ तास संपूर्ण वेळ सामाजिक एकता,बंधुत्व, समानता यासाठी प्रयत्नशील आहेत.रात्री अपरात्री कोणालाही रक्तातीची आवश्यकता भासल्यास त्यांच्याशी संपर्क साधला असता गरजूंसाठी रक्त उपलब्ध होते.

सोनालीताई जाधव या व्यक्तीमत्वामुळे रक्तदान चळवळीत काम करणार्‍या सर्व रक्तदात्यांना प्रेरणादायी आशेचा किरण दिसू लागला आहे. रक्तदान चळवळीत काम करताना सोनालीताई जाधव म्हणतात श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषणदादा सुर्वे व राज्य संपर्क प्रमुख आप्पासाहेब घोरपडे यांनी रक्तदान चळवळीत सहभागी होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषणदादा सुर्वे व राज्य संपर्क प्रमुख आप्पासाहेब घोरपडे नेहमी म्हणतात सोनालीताई जाधव ह्या रणरागिनी म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलांनी देखील रक्तदान चळवळीत काम केलं पाहिजे.

Exit mobile version