दिवाळीला लक्ष्मी पुजनाचे विशेष विधान आहे. या दिवशी संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शुभ मुहुर्तात देवी लक्ष्मी, विघ्नहर्ता भगवान गणेश आणि देवी सरस्वतीची पुजा आणि आराधना केली जाते. पुराणांच्या अनुसार कार्तिक अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री महालक्ष्मी स्वयं भूलोकात येते आणि प्रत्येक घरात विचारण करते. या काळात जे घर प्रत्येक गोष्टीने स्वच्छ आणि प्रकाशवान असतं तिथे देवी अंश रूपात थांबते. या कारणामुळेच दिवाळीच्या निमित्ताने साफ-सफाई करून विधी पूर्वक पुजन केल्याने देवी महालक्ष्मीची विशेष कृपा असते. या दिवशी लक्ष्मी पुजनासोबत कुबेर पुजा ही केली जाते. पुजेच्या वेळी ह्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजनाआधी घराची साफ-सफाई करावी. पूर्ण घरात वातावरणाची शुद्धी आणि पवित्रतेसाठी गंगाजलाचा शिडकाव करावा. घराच्या दारावर रांगोळी काढावी आणि दिवा लावावा. पुजा स्थळी एक चौरंग ठेवून त्यावर लाल कापड टाकून त्यावर लक्ष्मी- गणपतीची मूर्ती ठेवावी. चौरंगाजवळ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीवर हळदी कुंकू लावून, दिवा लावून पाणी, मोळी, तांदूळ, फळ, गुळ, हळदी, गुलाल इत्यादी अर्पित करावा. देवी महालक्ष्मीची स्तुती करावी. या सोबतच देवी सरस्वती, काली, भगवान विष्णू आणि कुबेर देवाची ही पुजा विधान पूर्वक करावी. लक्ष्मी पूजनासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावं.लक्ष्मी पूजा झाल्यावर तिजोरी, मशिनरी आणि व्यवासायिक उपकरणाची पूजा करावी. पुजा झाल्यानंतर गरजू लोकांना मिठाई आणि दक्षिणा द्यावी.
हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. दिवाळीचा पवित्र सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मी पूजा केली जाते. या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. माता लक्ष्मीला धनांची देवी म्हटले जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने भक्तांचे सर्व दु:ख दूर होऊन जीवन सुखी होते. चला जाणून घेऊया महालक्ष्मी पूजेची तिथी आणि शुभ मुहूर्त…
नरक चतुर्दशी…लक्ष्मी पूजन
नरक चतुर्दशीचं मोठं महत्त्व आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान केला जातो. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन 4 नोव्हेंबरला आहे. सायंकाळी घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन लक्ष्मी पूजन करतात.
– पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान
लक्ष्मी कुबेर पूजनाचा मुहूर्त-
सकाळी 6 वाजून 50 मिनिटं ते 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटं ते रात्री 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत.
मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटं ते 2.00 वाजेपर्यंत.
मध्यरात्री 3 वाजून 40 मिनिटं ते 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
(स्वाती नक्षत्र- सकाळी 7 वाजून 44 मिनिटं ते 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत. (5 नोव्हेंबर 2021)