Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Good News; डीआएटी या संस्थेचे एक पाऊल पुढे; एक्सरेमधूनसुद्धा होणार कोरोनाचे निदान!

Spread the love

दिल्ली | कोरोनाचे निदान करण्याकरता सध्या स्वॅप टेस्टचा वापर केला जातो. शासकीय संस्थांमध्ये सध्या ही टेस्ट मोफत आहे. पण खाजगी रुग्णालयात या चाचणीला ३ हजार रुपये आकारले जातात. कोरोनाचा विषाणू हा नाकावाटे शरीरात जातो आणि नंतर तो हृदयावर हल्ला करतो. प्रसंगी या परिस्थितीत रुग्णाच मृत्यूही होतो. पण आता रुग्णांना एक्सरेमधूनसुद्धा कोरोनाचे निदान होणार आहे.

खडकवासला येथील संरक्षण विभागाच्या डीआएटी या संस्थेने आता छातीच्या एक्सरेतून कोरोना आहे की नाही याचे तंत्र विकसित केले आहे. संशोधक सुनीता ढवळे यांनी हे तंत्र विकसित केले आहे. पुण्यासह दिल्लीतील वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा एक्सरे काढण्यात आला. रुग्णांनी आपला एक्सरे काढल्यानंतर diat.ac.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे लाल रंगाच्या पेजवर गेल्यावर अनेब्लड कोविड-१९ या ऑप्शनवर गेल्यानंतर तिथे आपला एक्सरे अपलोड करायचा आहे. साधारण काही सेकंदातच रुग्णाला कळते की आपल्याला कोरोना आले की नाही. तसेच काही शंका असल्यास लगेच रुग्णाला तपासणीसाठी पुढील सूचना दिल्या जातात. यासाठी संस्था कुठलेही शुल्क आकारत नाही. अशी माहिती डीआयएटीचे कुलगुरू सी. पी. रामनारायणन यांनी दिली आहे.

Exit mobile version