Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील राज्यातील २२,५०० कंत्राटी कर्मचारी यांना झाले किमान वेतन!

Spread the love

मुंबई | राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून कमी वेतनावर काम करत असून कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने किमान वेतन लागू करून कर्मचारी बांधवांना फरक मिळावा अशा प्रकारची मागणी संघटनेच्या वतीने वारंवार होत होती.त्यासाठी अनेकवेळा संघटनेच्या वतीने विविध प्रकारची आंदोलने केली होती.

कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रयभरणे यांची जानेवारी महिन्यात मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले असता नामदार श्री भरणे मामा यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री नामदार श्री राजेशजी टोपे साहेब यांच्याशी चर्चा घडवून कर्मचारी बांधवांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी विनंती केली होती.त्या अनुषंगाने आरोग्यमंत्री नामदार श्री राजेशजी टोपे साहेब यांनी राज्यातील २२,५०० जूने कंत्राटी कामगार यामध्ये डाॅक्टर, नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी यांना किमान वेतन तसेच त्यांच्या फरकासाठी २५३ कोटींची तरतूद करून त्यांना न्याय दिल्याने कंत्राटी कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष श्री हर्षल बाळासाहेब रणवरे पाटील यांनी मुंबई येथील मंत्रालयात कंत्राटी कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व पेढे देऊन राज्य संघटनेच्या वतीने सत्कार केला.यावेळी नामदार श्री भरणे मामा यांनी यापुढील काळातही कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पाठीशी त्यांच्या प्रश्नांबाबत खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.या आनंदमय प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष श्री बबलू पठाण,राज्यकार्यकारणी सदस्य श्री राहुल वाघमारे, श्री वासिम तांबोळी उपस्थित होते.

Exit mobile version