वालचंदनगर | राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय भरणे आणि इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांच्यातील प्रेमळ जिव्हाळ्याचे नाते विविध प्रसंगातून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी-वस्ती येथे सर्वसामान्य जनतेला व त्यांच्या कुटुंबातील कालापासून ते वृद्धांपर्यंत आपुलकीने विचारपूस करून काळजी घ्या, मास्क लावा….आजी तब्येत बरी आहे का ?
आपली पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून वेळप्रसंगी आपल्या गाडीतून मास्क काढून सर्वसामान्यांना मास्क वाटताना गेली अनेक दिवस काम करताना हजारो नागरिक पाहत आहेत ते दुसरे तिसरे कोणी नाही तर इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व श्री दत्तात्रय भरणे , वालचंदनगर (लोहार वस्ती) येथील श्री शैलेश शिंदे यांच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले तसेच स्वप्निल केंगार यांच्या आईचे ऋदयविकाराने निधन झाल्याने नामदार श्री भरणे मामा दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले असताना नामदार श्री भरणे मामा यांनी सांत्वन भेट झाल्यानंतर परिसरातील प्रत्येक कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करत आपल्या गाडीतील मास्क अबालापासून ते वृद्धांपर्यंत देऊन सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
परिसरातील चिमुकल्यांनी मामा…….मामा…..हाकेचा आवाज दिला……. चिमुकल्यांच्या हाकेला प्रतिसाद देत भरणे मामांनाही त्यांच्यासमवेत फोटो सेक्शनचा आनंद घेतला. मंत्रिपदावरती असूनही जमिनीवर पाय ठेवून संकटाच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आधार देऊन त्यांची सेवा करणारे नेतृत्व भरणे मामांच्या रूपाने महाराष्ट्रात क्वचित दिसते. सांत्वन भेटीच्या निमित्ताने नामदार श्री भरणे आल्यानंतर मामा आपण मंत्री व्हा किंवा आणखी कितीही मोठ्या पदावरती जावा परंतू तूम्ही आमच्यासाठी सदैव मामाच रहाणार असल्याची भावनिक प्रतिक्रिया श्री शैलेश शिंदे यांनी भरणे मामा यांना दिल्यानंतर नामदार श्री भरणे मामा यांनी हास्यमुद्रा करून प्रतिसाद दिला.