Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

इंदापूर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची धडपड!

Spread the love

मुंबई | इंदापूर तालुक्यातील लोणी – देवकर औद्योगिक क्षेत्रात नव्याने सुरू होणाऱ्या ‘Certoplast india pvt.Ltd.’ या कंपनीच्या स्थापनेबाबत आज उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मुकादम, प्रादेशिक अधिकारी श्री संजीव देशमुख हे दुरदृश्य प्रणालीद्वारे व उद्योग संचालनालायचे सह सचिव श्री संजय देगावकर व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी हे यावेळी उपस्थित होते.

इंदापूर येथे चार टप्प्यात स्थापण्यात येणाऱ्या या कंपनीमार्फत सुमारे दीडशे करोड रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून जवळपास पाचशेहून अधिक लोकांसाठी रोजगारनिर्मिती होणार असल्याचे यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत सांगण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, वन पाइंट विंडो अंतर्गत राज्यात देश-विदेशातून येत्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्याअनुषंगाने होणाऱ्या कायदेशीर बाबी तपासून विभागामार्फत कार्यवाही जलद होण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, औद्योगिकदृष्ट्या अनुकूल वातावरण असलेल्या इंदापूर औद्योगिक क्षेत्रात देश-विदेशातून येणाऱ्या नव्या कंपन्यांचे नेहमीच स्वागत असेल. त्यातून या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे ते यावेळी म्हणाले.

Exit mobile version