Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

नवरदेवाच्या पूर्वीच दत्तामामा कार्यालयात हजार! पुढे काय झाले पहा..!

यवत | इंदापूर शहरातील श्री. मधुकर चव्हाण यांचे चिरंजीव जयवंत यांचे विवाहसोहळा यवत येथील समृद्धी लॉन्स येथे शनिवार दि. २० रोजी सकाळी ११ वा. ३४ मि या शुभमुहूर्तावर होते. तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.दत्तात्रय मामा भरणे हे नेहमी प्रमाणे सकाळीच पुण्याहून इंदापूरच्या दिशेने जाताना यवत येथे विवाहस्थळी पोहोचले, पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की नवरदेव व्हराडी मंडळीच अजून विवाहस्थळी आलेले नाहीत. त्यावर त्वरित संपर्क साधून नवरदेव जयवंत यांची पाटस येथे भेट घेतली.

त्यांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्याचे मंत्री झालेले तरी आपल्या व्यस्त कामकाजातून दत्तामामा भरणे यांनी तालुक्याची असेल नाळ कधीही तुटू दिलेली नाही. तालुक्यातील जनतेशी त्यांची असलेली बांधिलकी यातून स्पष्ट दिसून येते.

Exit mobile version