Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

तारीख ठरली; मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन!

Spread the love

मुंबई । मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी २० फेब्रुवारीला राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आंदोलनाबाबत अधिसूचना जारी केली होती. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. शासनाकडून तसं पत्रही मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलं होतं. या निर्णयाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

आता एक दिवसांच्या या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची शक्यता आहे. तसेच सगेसोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version