मुंबई | या महिन्यात देशभरात कोरोना व्हॅक्सीनचे अभियान सुरू होणार आहे. या दरम्यान सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ने पहिल्यांदा आपल्या लसीच्या दराबाबत मोठा खुलासा केला आहे. इंस्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला ने सांगितलं की, कोरोनाची लस दोन वेगवेगळ्या किंमती असणार आहे.
सिरम इंस्टिट्यूटने सांगितलं आपल्या व्हॅक्सीनची किंमत..
इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सिरम इंस्टीट्यूटमध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजॅनेका च्या व्हॅक्सीन कोविशील्डची निर्मिती होत आहे. मात्र या लसीची किंमत अजून स्पष्ट झालेली नाही. सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया चे सीईओ अदार पुनावाल ने रविवारी लसीच्या किंमतीबाबत मोठा खुलासा केला आहे.
सामान्य व्यक्तीला ‘या’ दरात मिळणार लस..
अदार पुनावालाने सांगितलं की, सरकारला २०० रुपये प्रती लसीच्या दराने ऑक्सफोर्ड (Oxford)ची लस देणार आहेत. तिथेच सामान्यांना ही लस १ हजार रुपयांत मिळणार आहे. त्यांनी म्हटलं की, ही लस फाइजर-बायोएनटेकच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. तसेच याचे ट्रान्सपोर्टेशन देखील सोप असणार आहे. त्यांची कंपनी प्रत्येक महिन्यात ऑक्सफोर्ट-एस्ट्राजॅनेका लसीचे ५०-६० मिलियन डोस तयार करत आहेत.
सरकारसोबतच्या कराराची प्रतिक्षा..
अदार पूनावाला यांनी सांगितलं की, सरकारने २०२१ च्या मध्यापर्यंत देशभरातील १३० करोड जनतेला कोरोनाची लस देण्याचं लक्ष आहे. आम्ही सरकारकरता लस उपलब्ध करण्यास तयार आहोत. आम्ही सरकारला आमचा प्रस्ताव पाठवलं आहे. आता आम्ही सरकारसोबत करार करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.