Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनावर येतंय लवकर नवीन औषध त्याची किंमत ऐकून व्हाल हैराण; वाचा सविस्तर

Spread the love

मुंबई | कोरोनाच्या कमीआणि अतिगंभीर रुग्णांवरील उपचारासाठी आता बायोकॉन कंपनी एक औषध घेऊन येत आहे. या बायोलॉजिक औषधाचे नाव इटोलिझुमाब असे आहे. त्याची किंमत ८,००० रुपये प्रति बाटली एवढी असेल, अशी माहिती कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने म्हटले आहे, की कोविड-१९ मुळे कमी अथवा अतिगंभीर एआरडीएस प्रकरणात, सायटोकाइन रिलीज सिंड्रोमच्या उपचारासाठी भारतात आणीबाणीजन्य परिस्थितीत वापरासाठी, इटोलिझुमाब इंजक्शन च्या विक्रिला भारतीय औषध महानियंत्रक कडून मुंजुरी मिळाली आहे.

बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे. याच्या सहाय्याने कोविड​​-१९ च्या गंभीर रुग्णावर उपचार केला जातो.

बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मजदार-शॉ म्हणाले, जोपर्यंत व्हॅक्सीन उपलब्ध होत नाही, तोवर आपल्याला अशा जीव वाचविणाऱ्या औषधांची आवश्यकता असते. आपल्याला भलेही या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लस मिळो, पण, पुन्हा कोरनाचे संक्रमण होणार नाही, याची शक्यता देता येत नाही. आपण ज्या पद्धतीने ही लस काम करेल, अशी आशा करत आहोत, ती त्याच पद्धतीने काम करेल याचीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version