Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाची कॉलर ट्यून आमच्या मनाने ठरवू ठेवायची की नाही; आमदार रोहित पवार यांची मागणी!

Spread the love

अहमदनगर | कोरोनाबाबत जागृती करण्यासाठी सुरु केलेल्या कॉलर ट्यूनला ग्राहक वैतागले आहेत. जसे सर्व सामान्य नागरिक या वेळ खाऊ ट्यूनवर चिडले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सुद्धा यावर चिडले आहेत का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र या ट्यूनवर त्यांनी आवाज उठवला असून ‘ही ट्युन ऐच्छिक करावी, असं कितीजणांना वाटतं’, असं त्यांनी विचारले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. जसा कोरोनाचा संसर्ग वाढत गेला तसं याबाबत जागृती करण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत होते. त्याचाच एक भाग म्हणजे. मोबाईलवरील कॉलर ट्युन!. ही कॉलर ट्युन सुरुवातीला मराठीत नव्हती. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

जूनपासून कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्यात आली. पुढ त्यात सुधारणा करत सध्या नागरिकांच्या मनातील भितीही कमी होत चालली आहे. सध्या एसटी सुद्धा सुरु झाली आहे. सध्या फोन लावायचा असेल तर अनेकदा आधी कोरोनाबाबतची ट्युन वाजते आणि त्यानंतर फोनची रिंग वाजते. त्यामुळे अनेकांचा वेळ जातो. याचबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘आपल्यापैकी कितीजणांना वाटं की, कोरोनाबाबतची कॉलर ट्युन ऐच्छिक करायला पाहिजे?’, याला अनेकांना प्रतिसादही दिला आहे.

निरंजन यांनी म्हटलं आहे की, कॉलर ट्युन लांबलचक आहे. तेवढ्या वेळात एखाद्याला अर्जंट काम सांगून फोन कटपण होतो. महेश देवकर यांनी म्हटलं आहे की, आता ती कॉलर ट्युन बंद केली पाहिजे. फोन लागेपर्यंत काय बोलायचे होते हेच विसरायला होते. महत्त्वाच्या वेळी खूप आवघड होत आहे. सर्व ऐकल्यानंतर माहित पडते की, समोरचा फोन बिझी आहे किंवा बंद आहे. शितील यांनी म्हटलं आहे की, बंद व्हावी. विशाला पवार यांनी म्हटलं आहे की, एखादा माणूस बुडत असा किंवा एखाद्याला अटॅक आला आणि जर तो किंवा त्याच्या सोबत असणारा माणूस कोणाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असेल तर कोरोनाची कॉलरटु्यन संपेपर्यंत तो माणूस मृत्यूमुखी पण पडायचा. राम गरड यांनी म्हटलं आहे की, कॉलर ट्यूनचा वेळ जास्त आहे. निवांत वेळी फोन लावल्यावर आपण ती ऐकूही वाटणार नाही. पण विचार करुन पहा खूप अतिसंकटाचा प्रसंग असेल, त्यावेळी तोंडपाठ झालेलही ही ट्यून सुरु व्हावी. ती पूर्ण झाल्यावर तिकडून सांगाव ‘हा नंबर सध्या बंद आहे.’ व्यक्तींसाठी हा वेदनादायी आहे.

Exit mobile version