Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाच्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा: सांगवी पोलीस प्रशासन!

Spread the love

पिंपरी-चिंचवड | येत्या 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात साजरा होणारा गणेशोत्सव या पारंपरिक सणासाठी सांगवी पोलीस ठाणे यांच्या वतीने सोशल डिस्टन्स ठेऊन सार्वजनिक गणेश मंडळाची आराखडा बैठक सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.रंगनाथ बापू उंडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे घेण्यात आली. या बेठकीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख मुद्दे घेण्यात आले. यावर्षी संपूर्ण जगतात हाहाकार पसरवणारा करोना या विषाणू जन्य आजार पासून सुरक्षित सार्वजनिक सण कसा साजरा करणार या बद्दल सांगवी परिसरातील मंडळांशी चर्चा करण्यात आली.

प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार सांगवी परिसरातील सर्व मंडळांचे एक मत झाले. व यावर्षी गणेशोत्सव सर्वांनी साध्या पद्धतीने व प्रशासनाने घालून दिलेल्या अटीवर साजरा करण्यात यावा करोना या विषाणूला आळा घालण्यासाठी जनजागृत व समाज उपयोगी कार्य करू व प्रशासनाला मदत करूअशी सर्व मंडळांनी ग्वाही दिली. यावेळी
पोलीस हवालदार श्री.गिरीश राऊत, पोलीस नाईक श्री.चंदूलाल जाईबाई तसेच सांगवी विभागातून साई कोंढरे,मंदार दाभाडे,सौरभ शिंदे,सोन्या फरांदे,विनायक चव्हाण,सुनील कोकाटे,घोरपडे काका,सिद्धार्थ दळवी आदी पदाधिकारी मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version