Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोना; मुंबईत मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आज मध्यरात्रीपासून पुन्हा जमावबंदी लागू!

Spread the love

मुंबई : मुंबई शहरात कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आता प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीरपासून कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेशजारी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.

अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स पाळणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असल्याचं आदेशात म्हटलं आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version