Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आव्हाडांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद; पत्रकारांसाठी लवकरच लस देण्याची घोषणा!

Spread the love

मुंबई | करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी विनंती केली. आणि मुख्यमंत्र्यांनी या विंनतीची तात्काळ दखल घेतली.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस  देण्याची मागणी केली होती. आज आपल्या एका पत्रकार मित्राचे करोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही आव्हाड यांनी दिली.

पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे, अशी माहिती आव्हाड यांनी ट्विट करुन दिली आहे.

Exit mobile version