कोरोनाची कसल्याही प्रकारची लाट येऊ देणार नाही; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन!
मुंबई | महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथीचे रोग नियंत्रणरु ग्णालये सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. असेही त्यावेळी त्यांनी सांगितले, त्यामुळे कोविड १९ नंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील मृत्यू दर
कमी करण्याचा प्रयत्न सर्वांकडून केला जात आहे. मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. करोनाची कसल्याही प्रकारची लाट महाराष्ट्रात यापुढे फिरकुही देणार नाही यासाठी आम्ही सरकार या नात्याने सर्वजण प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी मोदीं समोर व्यक्त केला.