मुंबई | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्ताने हृदयालाछिद्र असलेल्या लहान मुलांची वाडिया हॉस्पीटलमध्ये विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून हृदयालाछिद्र असलेल्या लहान मुलांची तपासणी तसेच शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हे विशेष शिबीर आयोजीत केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय साहिता कक्ष वाडिया हॉस्पिटल आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी या शिबिराच्या उद्घाटन होणार आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मिताने हे शिबीर आयोजीत केले जाणार आहे.
हृदयालाछिद्र असलेल्या लहानमुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया केली जाणार आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी हे शिबीर आयोजीत केले जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. या शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. प्राथमिक तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनाआरोग्य योजने अंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
यासाठी पालकांनी वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी. शिवकुमार तडकर (मो.९७६९६४६०७०), नाव नोंदणीसाठी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे (मो.८९०७७७६००९), वैद्यकीय सहाय्यक स्वरूप काकडे (९८५१२३१५१५), वैद्यकीय सहाय्यक प्रसाद सूर्यराव (मो.८९०७७७६०१३) यांच्याशी संपर्क साधावा.