Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंचा आणखी एक मोठा निर्णय; मराठा समाजाची मागणी पूर्ण!

Spread the love

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवं सरकार स्थापन केल्यापासून आणि राज्याच्या सत्तेचा गाडा हाती घेतल्यापासून राज्यात नव्या निर्णयांचा धडाका लावला आहे. तसंच ते जुन्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेकही लावत आहेत. आजच त्यांनी 5020 कोटींच्या जीआराना स्थगिती देत ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का दिला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या निर्णय मराठा समाजाला  आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी मराठा समाजासाठी 30 कोटींचा जीआर काढला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी देण्याची मागणी मराठा संघटना आणि मराठा समाजाकडून करण्यात येत होती. ती मागणी मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तात्काळ निधी देण्याबाबत पाऊल उचलली आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला निधी मिळत नसल्याचा आरोप वारंवार मराठा समाजाकडून होत आला आहे. त्यासाठी मराठा समाजाकडून अनेकदा आंदोलनही करण्यात आले आहे. तसेच खुद्द संभाजी राजे यांनी मुंबईत उपोषण करत काही मागण्या सरकार पुढे ठेवल्या होत्या. त्यावेळीही एकनाथ शिंदे यांनी जाऊन छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली होती. आणि त्यांचं उपोषण सोडण्याचे विनंती केली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री होण्याआधी पासून एक मोठा रोल राहिला आहे. आगामी काळात मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्या मुख्यमंत्री कशाप्रकारे हाताळतात हे येणारा काळच सांगेल.

Exit mobile version