Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ओवी भडाळे पेशंटला CM फंडातुन उपचाराकरिता १ लाख रुपयांची आर्थिक मदत!

Spread the love

पुणे | मा.श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या आशीर्वादाने डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मा.श्री मंगेश चिवटे सर (मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख OSD) मा.श्री रामहरी राऊत सर (कक्ष प्रमुख शिवसेना वैदयकीय मदत कक्ष,महाराष्ट्र राज्य), मा. श्री माऊली धुळगंडे, (सहकक्ष प्रमुख शिवसेना वैदयकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाने ओवी प्रितम भडाळे वय. 5 वर्षे रा.पुणे या ठिकाणचे राहिवाशी असुन ज्युपिटर हाॅस्पिटल,पुणे येथे उपचार घेत होते,परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची असल्यामुळे सदरील खर्च त्यांच्या आवक्याबाहेर आहे म्हणून खर्च करू शकत नाहीत.

याचदरम्यान पेशंटच्या नातेवाईकांनी नवनिर्वाचित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोशल मीडिया प्रमुख महा राज्याचे शिवश्री भूषण सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता भूषण सुर्वे यांनी धाराशिव जिल्हा समन्वयक adv कानिफ कानतोडे व पुणे उपजिल्हा वैद्यकीय सहाय्य्क विशाल धुमाळ, राहुल ढवळे या सर्वांच्या मदतीने व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी याकरिता अर्ज केला होता, सदरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेशजी चिवटेयांच्या मार्गदर्शनाखाली अर्जाचा पाठपुरावा करून 4 दिवसांच्या आत फाईलला ग्रीन सिग्नल मिळताच, ओवीला पुढील उचारासाठी १ लाख रुपयांची उपचारासाठी मदत जाहीर करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अशी मदत मिळवून देण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष जोमाने काम करत आहे असे यावेळी नातेवाईकांनी सांगितले. यावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री  मा.श्री एकनाथ शिंदे साहेब, मंगेश चिवटे, भूषण सुर्वे आणि कानिफ कानतोडे यांचे विशेष आभार मानले, व सर्वांचे कौतुक केले.

कोणताही रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही प्रत्येक रूग्णास पक्ष, जात धर्म यापलीकडे जाऊन मदत मिळवण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एकनाथ शिंदे साहेब, मंगेश चिवटे साहेब, राम राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कटिबद्ध राहील असे आश्वासन भूषण सुर्वे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं.

Exit mobile version