Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

६ जून पर्यंत छत्रपती संभाजीराजेंचा अल्टिमेटम; अन्यथा मराठा समाज करणार आंदोनल!

Spread the love

मुंबई |  मराठा समाजाला आरक्षण  मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा  करत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आता संभाजीराजे आपली मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

6 जून पर्यंत अल्टिमेटम..

6 जून शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. म्हणून मी स्पष्टच सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना… 6 जून रोजी काय झालं शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका, रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे..

सारथीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे, सारथीसाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करता येऊ शकते का हे पूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी, शरद पवाराांनी स्पष्ट करावं तिसरा पर्याय 342 ए च्या माध्यमातून आपला प्रस्ताव केंद्राकडू मांडू शकता. या माध्यमातून आपल प्रपोजल राज्यपालांसमोर मांडावे केंद्रा पुढे मांडा गायकवाड अहवालातील तृटी दुर करा. राष्ट्रपतींकडे विषय सादर करावा आयोग स्थापन करा.

दुसरा पर्याय आहे क्युरेटिव्ह पीटिशन पहिला पर्याय राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करायला हवी, केवळ लोकांना दाखवण्यासाठी नको तर फूल प्रुफ असावं मराठा समाजाला न्याय मिळवून द्या, आम्हाला बाकी देणंघेणं नाही – संभाजीराजे यांचा सत्ताधारी आणि विरोधकांना निर्वाणीचा इशारा वेळ पडली तर कायदा सुद्धा हातात घेतील, आज माझ्यामुळे ते शांत आहेत मराठा समाज व्यथित झाला आहे मराठा समाजातील नागरिक अस्वस्थ आहेत, दु:खी आहेत मराठा समाजाला वेठीस धरू नका मला साथ देणाऱ्या मराठा समाजाचे आभार मानतो कोरोनामुळे मवाळ भूमिका घेतली कोर्टाच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालो 50 लाख लोक आझाद मैदानात आले होते आपल्या सर्वोच्च न्यायलयाने फॉरवर्ड क्लास असे म्हटल आहे न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल अवैध ठरवण्यात आला

मराठा समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात आमचा लढा कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाहीये कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आमची लढाई नाहीये 2007 पासून महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे मराठा समाजाला न्याय मिळावा ही एक सरळ मागणी आमची आहे.

Exit mobile version