Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

चंद्रकांत पाटलांची नवीन वादात उडी; म्हणतात महाराष्ट्राचे 2 मुख्यमंत्री, एक मातोश्रीवर आणि दुसरे..!

पुणे | माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडूनच दाखवा’ असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले होते. त्यांच्या या आव्हानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा’ असा पलटवार केला आहे. तसंच, महाराष्ट्र राज्यात दोन मुख्यमंत्री आहे, असा सिक्सर ही त्यांनी शरद पवारांनाचे नाव न घेता लगावला.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सडकून टीका केली. ‘4 महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहे. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले. ‘महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहे. एक जे ‘मातोश्री’वर बसून काम करत आहे. आणि दुसरे हे राज्यभर फिरत आहे’, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता पाटील यांनी टोला लगावला.

त्याचबरोबर अजित पवार अपयशी ठरत आहेत. हे दाखवायचे प्रयत्न सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. आता हे कोण करत आहे हे तुम्ही पाहा, असं म्हणून चंद्रकांत पाटलांनी  उद्धव ठाकरेंकडे बोट केले आहे.

Exit mobile version