चाकण | चाकण औद्योगिक क्षेत्रात कोविड१९ चा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. व सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढत आहे.आपल्या पुणे जिल्ह्यात देखिल ५० हजार पेक्षा जास्त रूग्ण संख्या झाली आहे. केद्र व राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वांचा आधारे अनेक उद्योग कमी मनुष्यबळाचा वापर करून सूरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. चाकण एम.आय.डी.सी परीसरात पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातुन येणारे कामगार संख्या जास्त आहे.त्याच प्रमाणे कोरोना रूग्णानमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.एम.आय.डी.सी मध्ये कामगार एकत्र येत असल्याने सांसगींक प्रादुर्भाव वाढु शकतो.
त्यासाठी छावा संघटना खेड तालुका यांचा वतीने पुणे जिल्ह्याधीकारी मा. नवल किशोर राम यांना निवेदन देऊन अशी मागणी करण्यात आली आहे की चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांचा कामगारांची कोवीड१९ टेस्ट ही बंधनकारक करण्यात यावी. चाकण औद्योगिक क्षेत्रात कोविड१९ ची खुप भयानक परस्थीती आहे.व या ठिकाणी येणारे कामगार हे कोरोना हॉटस्पॉट परीसर पुणे- पिंपरी-चिंचवड येथिल जास्त प्रमाणात आहे. तरी शासनाने या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.