Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

धक्कादायक; BSNL कंपनीचा 20 हजार कर्मचाऱ्यांना रामराम!

Spread the love

पुणे | टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने जवळजवळ आपल्या 20 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या एक वर्षापासून या कर्मचाऱ्यांना वेतनही मिळालेले नसताना हा धक्कादायक निर्णय घेतल्याची घटना समोर आली आहे. आधीच आपले कंबरडे मोडलेल्या बीएसएनएलने कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या आर्थिक संकटात हा निर्णय घेतला आहे. याआधीही कंपनीने 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांना वेतन न मिळण्याच्या तक्रारी होत असतानाच घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे रोष व्यक्त होत आहे. कंपनीच्या या परिस्थितीला स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना जबाबदार असल्याचे BSNLच्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष व्ही के पुरवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

गेल्या 14 महिन्यांपासून  मिळाला नसल्यामुळे 13 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहीती कर्मचारी संघटनेने दिली आहे. VRS योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमीत वेळेत पगार दिला जात नाही. सर्व मुख्य व्यवस्थापकांना खर्चात कपात करण्याचे आदेश बीएसएनएलच्या एचआरने गेल्या एक सप्टेंबरला दिले होते. त्याच बरोबर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी ठेवण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात आणि कामगार कपात केली आहे. अशातच बीएसएनएलने घेतलेला हा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

Exit mobile version