मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावालागला आहे. भाजपाच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी केली होती. पुजा चव्हाण प्रकरणात व्हॉईस कॉल रेकॉर्डिंग सोशलमीडियावर व्हायरल होत होती.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याने सेनेला मोठा धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचंसिद्ध होत आहे. राठोड यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर पूजाला आत्ता मुक्ती मिळाली अशीप्रतिक्रिया भाजपाच्या नेत्यांमधून येत आहे.
संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेले फोटो, ऑडिओ क्लिप्सआणि काही व्हिडिओ सर्वांसमोर आल्यांतर त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या कारणामुळे मागील कित्येक दिवसांपासून त्यांचा राजीनामाघेण्याची मागणी भाजपने लावून धरली होती. वनमंत्री संजय राठोड राजीनामा दिला आहे. पण, पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनीविरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे.