Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

BREKING NEWS; अखेर शिवधर्म फाऊंडेशन आणि सर्वच सामाजिक संस्थांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे संभाजी बीडी वरील नाव होणार हद्दपार!

Spread the love

पुरंदर 

गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हे संभाजी बिडी या नावाने वाघिरे कंपनी त्यांच्या बिडी वरील पॅकेज वरती हे नाव छापत होती या नावासाठी बर्‍याच सामाजिक संस्था राजकीय संस्थांनी आंदोलनही केली परंतु ते आंदोलन तेवढ्या पुरतीच मर्यादित राहिली. मात्र यानंतर महाराष्ट्राचे तसेच सामाजिक क्षेत्रांमधील नावाजलेले नाव म्हणजे दीपक अण्णा काटे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी बराच यावरती अभ्यास करून ठरवले की माझ्या आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जो गैरवापर होत आहे हा थांबवला पाहिजे आणि याच उद्देशाने दीपक काटे यांनी महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हाधिकारीआणि तहसीलदारांना शिवधर्म फाउंडेशन तसेच सामाजिक संस्थांना विनंती करून हे नाव हटवावे यासाठी विविध प्रकारे अर्ज दाखल केले परंतु याची दखल कोणी घेतली नाही.

यावेळी उपोषण कर्त्यांनी संभाजी विडी उत्पादन करणार्‍या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार कंपनीचे मालक अाणि संचालक मंडळ यांच्यावर छञपती संभाजी महाराज यांची बदनामी व अपमान करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. महापुरषाच्या नावाचा गैरवापर करणे अक्षम्य चुक अाहे. लोकभावनेचा विचार करुन छञपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा. यानंतर शिवधर्म फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार अमोल मेटकरी यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला. अखेर शिवधर्म फाउंडेशन महाराजांचे नाव न  हटवल्यास आंदोलन अधिक तीव्र करुन राज्यात आम्ही १५ सप्टेंबर पासुन साखळी आंदोलन करणार आहे असे सांगून साबळे वाघिरे कंपनीने नाव बदलल्या शिवाय त्यांची एकही गाडी महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा पवित्रा घेतला.अखेर साबळे वाघिरे कंपनीने पुण्यात पत्रकार परिषदेत नाव बदलणार असल्याची माहिती दिली.त्यामुळे महाराष्ट्रातून सर्व शिवप्रेमींनी दिपक आण्णा काटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.आपल्या महाराजांचा रोज सुरू होणारा अवमान आता थांबणार म्हणून सर्व शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे व अानंदाचे वातावरण आहे.

त्यानंतर शिवधर्म फाउंडेशन तसेच सामाजिक संस्थांना एकत्र करून दीपक अण्णा काटे यांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी अमरण उपोषणाला सुरुवात केली आणि सरकारला जाहीर इशारा देखील दिला की जोपर्यंत आमच्या महाराजांचे नाव या बीडीच्या पॅकेजिंग वरून हटणार नाही तोपर्यंत आता आम्ही शिवभक्त आणि संबंध महाराष्ट्र हा गप्प बसणार नाही याची दखल घेत पोलीस प्रशासनाने एका रात्रीमध्ये आमरण उपोषण उठवण्याचे प्रयत्न केले परंतु सर्वांना माहिती होते की आता हे नाव काढावे लागणार हे निश्चित झाले होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या आंदोलनांना वेगळे वळण लागू नये याची दखल घेत संभाजी बिडी हे नाव वाघिरे कंपनीने लवकरच काढू असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले त्यामुळे अखेर शिवधर्म फाऊंडेशनचे दिपक अण्णा काटे यांनी सर्वच पत्रकार बांधव तसेच आम्हाला सर्व सामाजिक संस्था असतील त्यामध्ये श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट, संभाजी ब्रिग्रेड, अखिल भारतीय मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चा, पैलवान ग्रुप, छावा ग्रुप, शिवशंभू स्वराज्य संघटना, तसेच महाराष्ट्रातील सर्व सामाजिक राजकीय संघटनांनी यामध्ये आम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच जे शक्य झाले आणि आम्ही खरंच खूष आहोत असे यावेळी पत्रकारांना संबोधताना सांगितले

Exit mobile version