Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Breaking Updates; इंदापुरमध्ये कारागृहात कोरोनाचा सुळसुळाट, 17 कैद्यांसह 2 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह!

इंदापुर | इंदापुरच्या उपकारागृहात १७ कैद्यांसह 2 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कैद्यांवर ही वेळ आली आहे. याबाबत राज्य ग्राहक संरक्षण परीषद सदस्य अॅड. तुषार झेंडे यांनी कैद्यांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न निर्माण झाल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तात्काळ कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. इंदापूर येथील उपकारागृहात २४ ऑगस्ट रोजी 1 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. मात्र,या पॉझिटीव्ह कैद्याच्या बाबतीत संबंधित प्रशासनाने व आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेतली नाहि. परिणामी पुढील 2 ते 3 दिवसात त्याच्या बरॅकमध्ये इतर १७ कैद्यांना व दोन पोलिसांना कोरोना ची लागण झालेली आहे. याबाबत प्रशासनाचा खूप मोठा हलगर्जीपणा आहे. तसेच १७ बाधित कैद्यांना उपकारागृहातच बरॅकमध्ये विलगीकरण केले आहेत.

सामाजिक अंतराचा सोशल डिस्टन्स पूर्णपणे फज्जा उडाला आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अन्वये कैद्याला देखील मानवाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्याला देखील वेळेवर औषध उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरच्या ठिकाणी जेलच्या बरॅकमध्ये क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबतीत राष्ट्रीय मानवाधिकार
आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तात्काळ कारवाईसाठी तक्रार दाखल केल्याचे अॅड झेंडे यांनी सांगितले. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात बाब विनंती करण्यात आली आहे तसेच या कोरूना पॉझिटिव आलेल्या सर्व कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणेच मानवी हक्काचे संरक्षण करून तात्काळ विलगीकरण करून औषधोपचार देण्यात यावे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनावर आहे याची त्यांनी नोंद घ्यावी,अशी मागणी अॅड.झेंडे यांनी केली आहे.या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. तक्रारीचा क्रमांक देखील मिळाला आहे. लवकरच याबाबत कारवाईचे आदेश मिळण्याची शक्यता आहे.या तक्रारीमुळे कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

FacebookTwitterWhatsAppShare
Exit mobile version