Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

BREAKING; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे सोपे होणार!

Spread the love

मुंबई दि. 24राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळअर्ज सादर करता यावेत यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या कक्षाचेकाम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार या कक्षाचे अॅप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यातयेणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय समितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकासखारगे,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे उपस्थित होते. या बैठकीत श्री. खारगे यांनी कक्षाचा कामाचा आढावाघेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या. निधी कक्षाचे प्रमुख श्री. चिवटे यांनी बैठकीत सांगितले की, ऑनलाईन एप्लिकेशन तसेचवेबसाईट द्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपलब्ध होणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मोबाईलअॅप्लीकेशन तसेच मदत मार्गदर्शनासाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरु करण्यात येईल.

तसेच योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय जिल्हा रूग्णालयांचे शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचेअधिष्ठता यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितलेवैद्यकीय सहाय्यता निधीमधील रुग्णालयांची संख्या वाढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना सहाय्यता उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णालयांचासमावेश (पॅनल) करण्यात येणार आहेत. याकरीता रूग्णालयाने अर्ज सादर करावे यासाठी रूग्णालयांना प्रोत्साहन मार्गदर्शन दिले जाणारआहे. तसेच रुग्णांलयांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यातील गरजू रुग्णांपर्यंतमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पोहचवा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे श्री. चिवटे यांनीसांगितले.

तसेच या बैठकीत लेखाधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, डॉ.आनंद बंग आरोग्य विषयक सल्लागार, डॉ.रागिणी पारेख अधिष्ठता,सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.कैलास पवार जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे , डॉ.बी.एस.नागावकर मुख्य वैद्यकीय सल्लागार,महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुंबई (से.नि.), डॉ.मोहन जोशी अधिष्ठता, सायन रुग्णालय, मुंबईडॉ.संजय सुराग अधिक्षक, सर जे.जे रुग्णालय, मुंबई, डॉ.प्रविण बांगर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, के..एम.रुग्णालय, मुंबई, डॉ.अविनाश गुटेसर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.अरुण राठोड सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.दिनेश धोंडी सर जे.जे.रुग्णालय, मुंबईडॉ.दिलीप गवारे, सर जे.जे.रुग्णालय, मुंबई, डॉ.ममता जवादे राज्य कामगार विमा सेवा, मुंबई उपस्थित होते.

Exit mobile version