पुणे | पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरमइन्स्टिट्यूटची इमारत आहे.
कोव्हिशील्ड या कोरोना लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. या इमारतीत आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमनदलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्टआहे.