मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगत मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देणारे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हे फोन दुबईतून आले आहेत. धमकी देणाऱ्याकडून दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा दावा केला आहे.