Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

BREAKING NEWS; यंदा सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा, सरकारची नियमावली जाहीर!

Spread the love

मुंबई| संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  तत्पूर्वी राज्यातील मूर्तीकारांनीही महाविकास  महाविकासआघाडी सरकारकडे तातडीने गणेशोत्सवाबाबत धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली होती.

रेश्मा खातू यांनी यासंदर्भात मूर्तीकारांची बाजू मांडली. गणेशोत्सवाला अवघे दोन महिने उरलेले असताना मूर्तीकार मात्र चिंतेत आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तींचे काम मूर्तीकारांनी सुरू केलेले नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी. जेणेकरून मूर्तिकारांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल. मूर्तीकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा असल्याचे रेश्मा खातू यांनी म्हटले होते.

गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नकोच

यंदाच्या गणेशोत्सवदरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जात आहे.

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी
विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

Exit mobile version