Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

बारामतीच्या शिरष्णे गावात मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न!

बारामती.श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट बारामती यांच्या संयोगा ने व शिवजयंती उत्सव समिती शिरष्णे(सांगवी, बारामती) आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले या शिबिरात एक सामाजिक बांधिलकी जपत सर्व समाज बांधवांनी शिवजयंती च्या प्रसन्न दिनी रक्तदान केला खर तर आताच्या काळात रक्तदान करणं खुप आवश्यक आहे आणि ती आवश्यकता या सर्व शिरष्णे ग्रामस्थांनी घेतली  आणि रक्तदान केलं.

रक्तदान हि एक चळवळ उभी झाली पाहिजे हा श्री शिवशंभु चॅरिटेबल चा मुख्य हेतू आहे आणि या हेतू साठीच ट्रस्ट ला अशा  सहकार्याची मोलाची साथ मिळत आहे.

प्रत्येक जनाणी या मोहिमेत सहभागी व्हाव आणि या रक्तदान चळवळीत श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट ला सहकार्य करावे

श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत कार्याध्यक्ष माऊली खाडे यांनी शिवजयंती उत्सव समिती शिरष्णे व आमचे सहकारी शिवश्री. शेखर जाधव,शिवश्री. तुषार खलाटे व सर्व शिरष्णे.ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version